Turkey Syria Earthquake : भूकंपाच्या जखमांमधून तुर्की कसं सावरणार?
तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे (Earthquake) आतापर्यंत 19300 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुर्कीला बसलेल्या या महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत. पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे. (Source: AP)
तुर्कीच्या याच विनाशकारी घटनेनंतर भारतानंही तातडीनं मदत जाहीर केली. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम्सही धाडल्या. (Source: AP)
त्यांनी बचावकार्यंही सुरु केलं. तुर्कीतल्या विध्वंसक भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. (Source: AP)
आतापर्यंत मृताची संख्या 19 हजारांच्या वर गेली आहे. (Source: AP)
दोन दिवसानंतरही तुर्कीमध्ये बचावकार्य सुरु झाले आहे. तुर्कीत दहा भारतीय अडकले आहेत. (Source: AP)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. (Source: AP)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेत तुर्की आढललेल्या भारतीयांबद्दल माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा म्हणाले की, तुर्कीमध्ये दहा भारतीय अडकले आहेत. ते सध्या सुरक्षित आहेत. पण एक भारतीय अद्याप बेपत्ता आहे. तुर्कीच्या अडाना येथे भारताने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. (Source: AP)
तुर्कीत बेपत्ता असलेल्या भारतीयाचा शोध सुरु आहे. तो बेपत्ता झालेला भारतीय बेंगलोर येथील आहे. (Source: AP)
आम्ही त्याच्या कुटुंबियाच्या संपर्कात असल्याचं संजय वर्मा यांनी सांगितलं.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते संजय शर्मा म्हणाले की, तुर्कीत जवळपास तीन हजार भारतीय राहतात.
त्यांच्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केलाय. तिथं आतापर्यंत 75 जणांचे कॉल आलेले आहेत. याशिवाय भारतीयांना विमानांमधून मदत पाठवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत.
डब्ल्यूएचओनं तुर्की आणि सीरियामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.