Beautiful Birds : हे आहेत जगातील 10 सर्वात सुंदर पक्षी!
या पृथ्वीवर प्राणी-पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आहेत. त्यातील काही जमिनीवर तर काही पाण्याखाली राहतात. आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या काही प्रजाती आहेत. काही दिसायला अतिशय आकर्षक आणि सुंदर असतात तर काही गोड आवाजही काढतात. जगात असे काही पक्षी आहेत त्यांना जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांच्या श्रेणीतही स्थान देण्यात आले आहे. हे पक्षी अतिशय सुंदर असतात, त्यामुळे लोकांना ते बघायला आवडतात. (Photo : Pexel)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोल्डन फिजेंट: हा पक्षी प्रामुख्याने चीन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड, न्यूझीलंड इत्यादी देशांमध्ये आढळतो. गोल्डन फिझंटचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पंख कमी असल्याने ते मोठ्या उंचीवर उड्डाण करू शकत नाही, परंतु ते खूप वेगाने धावू शकतात .या पक्ष्याचे वय सुमारे ५ वर्षे असून त्याचे वजन ८०० ग्रॅमपर्यंत असते. याची उंची २६ इंचापर्यंत असते. या पक्ष्याची जास्त प्रमाणात शिकार होत असून या पक्ष्यांच्या प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. (Photo : Pexel)
स्कारलेट मकाव: हा एक प्रकारचा लाल पोपट आहे, हा उपोष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलात आढळणारा पक्षी आहे. हे सामान्यत: दक्षिण अमेरिकेतील सवाना मध्ये आढळते. स्कारलेट मकाव या पक्ष्याचे वय ५० वर्षापर्यंत असते आणि त्यांचे वजन २.५ किलोपर्यंत असते. त्यांना कळपात राहून फळे, बिया, पाने, फुले, कीटक वगैरे खाऊन जगणे आवडते. बाजारात या पक्ष्याची किंमत खूप जास्त असल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. (Photo : Pexel)
फ्लेमिंगो पक्षी : फ्लेमिंगो हे पक्षी तलावांच्या दलदलीत राहणे पसंत करतात. या प्रकारच्या हंसाच्या जगात ६ प्रजाती आढळतात. त्यांचे वजन ३ किलोपर्यंत असून त्यांची लांबी ५ फुटांपर्यंत असते. हा हंस दक्षिण युरोप, आफ्रिका, भारतीय उपखंड इत्यादी ठिकाणी आढळतो. त्यांचे पाय खूप लांब असतात आणि ते अनेकदा एका पायावर उभे दिसतात. त्यांना कळपात राहायलाही आवडतं. (Photo : Pexel)
हाईसिंथ माकउ: ब्राझील, दक्षिण अमेरिकेत आढळणारा हाईसिंथ माकउ हा अतिशय सुंदर पोपट आहे, त्यांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, संपूर्ण जगात त्यांची संख्या फक्त ५००० च्या आसपास आहे. हे डोक्याच्या वरच्या भागापर्यंत 1 मीटर (3 फूट 3 इंच) लांब असते आणि वजन 1.2-1.7 किलोपर्यंत असू शकते. त्याच्या डोळ्यांभोवती पिवळा रंग असतो. त्याची मजबूत चोच त्याला अन्न खाण्यास मदत करते, हे पक्षी दिसायला अतिशय सुंदर असतात .
मोर : भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा अतिशय सुंदर पक्षी आहे .त्यांनी सादर केलेले नृत्य अतिशय खास असून तो आपली शेपटी आणि पंख पसरवून दुर्मिळ प्रकारचे नृत्य सादर करतो. याच्या अनेक प्रजाती आढळतात, काही हिरव्या, पांढर्या, निळ्या तर काही रंगीत असतात. हा प्राचीन काळापासून आवडणारा पक्षी आहे, हिंदू धर्मात त्याचा उल्लेखही आढळतो. मोराची लांबी २१५ सेंटीमीटर व उंची सुमारे ५० सेंटीमीटर असते.
ब्लू जय : हा उत्तर अमेरिकेतील मूळ पक्षी असून अमेरिकेच्या संस्कृतीचाही भाग आहे, त्याचे पंख निळे दिसतात पण प्रत्यक्षात तो तपकिरी असतो. ते 6 वर्षांपर्यंत जगू शकतात. या पक्ष्याची शिकार बाज, घुबड हे मोठ्या प्रमाणात करतात. हा एक स्थलांतरित पक्षी आहे जो कधी कळपात तर कधी कळपाशिवाय दिसतो. ते अनेकवेळा गरुडाचा आवाजही काढताना दिसले आहेत जे खूप आश्चर्यकारक आहे.
अटलांटिक पफिन : समुद्रात राहणारा हा पफिन पाण्यात हालचाल करण्यास सक्षम असल्याने माशांना आपला चारा बनवतो. त्याची लांबी २८ सेंमी.पर्यंत असते. या पक्ष्याचे वय १८ ते २० वर्षे असते . उन्हाळ्यात हा पक्षी समुद्राच्या किनाऱ्यावर पाहायला मिळतो. मादी पफिन 1 वर्षात 1 अंडी देते, ज्याची काळजी मादी आणि नर दोघेही घेतात.
वुड डक पक्षी : उत्तर अमेरिकेत आढळणारा हा पक्षी अतिशय सुंदर आहे, हा एक प्रकारचा बदक आहे ज्याची लांबी ४७ ते ५४ सेंमी पर्यंत असते आणि त्याचे वजन ८०० ग्रॅमपर्यंत असू शकते. नर बदके मादीपेक्षा अधिक रंगीबेरंगी असतात, त्यांचे डोळे लाल असतात, मादी एका वेळी १५ अंडी देऊ शकतात, ते बेरी, ओक आणि बिया खाऊन जगतात. त्यांची संख्या वाढत असली तरी आजही त्यांची शिकार केली जाते.
कील बिल टूकेन : कील बिल टूकेन हा ब्राझीलचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा पक्षी दक्षिण मेक्सिकोपासून कोलंबियाच्या उष्णकटिबंधीय जंगलात आढळतो. तो प्रामुख्याने बियाणे, कीटक, सरडे, साप खाऊन जगतो. याची लांबी 55 सेंमी पर्यंत वाढू शकते आणि वजन 500 ग्रॅम पर्यंत असतो आणि त्याला जास्तीत जास्त कळपात राहणे आवडते. विशेष म्हणजे, ते एका वेळी 3 ते 4 अंडी देतात.
बोहेमियन वैक्सिंग : बोहेमियन वैक्सिंग हा चिमणीचा एक प्रकार आहे ज्याची लहान टोकदार आणि तीक्ष्ण चोच असते, ती आपल्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी झाडांवर घरटी बनवते आणि नर आणि मादी दोघेही त्यांचे संरक्षण करतात. या पक्ष्याचे वजन ५५ ग्रॅमपर्यंत असून त्याची लांबी ९ इंचपर्यंत असू असते. (Photo : Pexel)