Maratha Reservation : 'मुंबईत मराठा समाज आल्यानंतर..' AI च्या मदतीने साकारलं मराठा आंदोलनाचं चित्र!
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अमित वानखेडे यांनी मराठा आंदोलनाचं मुंबईत आझाद मैदानावरील चित्र उभं केलं आहे. (Photo credit : FB/Amit Wankhade)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'२० जानेवारीला मुंबईत मराठा समाज आल्यानंतर..' या कल्पनेवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ही चित्रं तयार केली आहेत. (Photo credit : FB/Amit Wankhade)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे. (Photo credit : FB/Amit Wankhade)
त्यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे मराठे निघतील असेही जरांगे म्हणाले आहेत. (Photo credit : FB/Amit Wankhade)
त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात कधी उपोषण सुरु होणार आणि आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास कसा असणार, सोबतच किती दिवसांचा असणार याबाबतचा संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे यांनी सांगितला आहे. (Photo credit : FB/Amit Wankhade)
आंतरवाली सराटी गावातून 20 जानेवारीला जरांगे सोबत आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे मराठे निघणार आहोत.रस्त्यात लोकं आमच्या रॅलीत सहभागी होतील. पायी प्रवास करत मुंबईत धडकणार. (Photo credit : FB/Amit Wankhade)
जरांगे म्हणाले, आंदोलनाची तयारी करण्यासाठी तोपर्यंत समाजाला वेळ पाहिजे.कारण हा विषय लहान नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागणार आहे. (Photo credit : FB/Amit Wankhade)
20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता जरांगे सोबत आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे निघणार आहोत. (Photo credit : FB/Amit Wankhade)
मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा दिवस आम्हाला लागतील. अंदाजे 26 जानेवारीला प्रत्यक्षात मुंबईत उपोषणाला सुरुवात होऊ शकते. (Photo credit : FB/Amit Wankhade)
या काळात 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे. या क्युरेटीव्ह याचिकेला आम्ही कधीच विरोध केला नव्हता. पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की, ते आरक्षण टिकेल का?, पुन्हा गेल्यावेळी प्रमाणे होऊ नयेत. न्यायालयात खुली सुनावणी झाली तर ते आरक्षण टिकण्याची शक्यता असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.. (Photo credit : FB/Amit Wankhade)