Punctual Airlines: जगातील 'या' विमानसेवा आहेत वेळेला कटिबध्द, परंतु एकाही भारतीय विमानसेवेचा समावेश नाही
या यादीत अव्वलस्थानी ब्राझीलची विमानसेवा आहे. ज्याची वक्तशीरपणाची टक्केवारी 88.93 आहे आणि तिचे नाव Azul Brazilian Airlines आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, जपानच्या ऑल निप्पॉन आणि जपान एअरलाइन या दोन विमानसेवा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांचा वक्तशीरपणाचा दर 88.61 टक्के आणि 88 टक्के आहे.
LATAM एअरलाइन्सचा वक्तशीरपणाचा दर 86.31 टक्के आहे. ही लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठी विमान कंपनी आहे.
2017 मध्ये या कंपनीत एकूण 43 हजार कर्मचारी होते. 2018 मध्ये त्याची एकूण मालमत्ता 17.566 अब्ज डॉलर होती.
अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सचा वक्तशीरपणाचा दर 83.63 टक्के आहे. दररोज 5,400 प्रवासी यामधून प्रवास करतात.
कोलंबियाची एव्हियान्का S.A. एअरलाइन्सचा वक्तशीरपणाचा दर ८३.४८ टक्के आहे.
दुबईच्या एमिरेट्स या विमानसेवेचा वक्तशीरपणाचा दर 81.30% आहे
युनायटेड एअरलाइन्सचा वक्तशीरपणाचा दर 80.46% आहे.
कतारच्या एअरलाइनचा वक्तशीर दर 78.32 टक्के आहे.
अमेरिकेची विमानसेवा अमेरिकेतील सर्व विमानाचे उड्डाण वेळेवर करते. त्यांचा वक्तशीरपणा 78.29 टक्के इतका आहे.