पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, इम्रान खान यांच्या आयुष्यातील 10 महत्त्वाच्या गोष्टी
इम्रान खान यांचे पूर्ण नाव इम्रान खान नियाजी असे आहे. त्यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1952 रोजी लाहोरमध्ये झाला होता. त्यांचे वडील इकरमुल्लाह खान हे इंजिनीअर होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइम्रान खान यांचे शिक्षण एचिसन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले आहे. तसेच त्यांनी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमधील महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.
इम्रान खान यांनी 1972 साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे.
इम्रान खान यांनी इंग्लंडमध्येच त्यांच्या क्रिकेटच्या करिअरला सुरुवात केली.
राजकारणात प्रवेश करण्याआधी इम्रान खान हे क्रिकेटपटू होते. इम्रान खान यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला 1992 साली विश्वकप जिंकून दिला होता. तसेच त्या सामन्यात त्यांनी 72 धावा करत मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब मिळवला होता.
इम्रान यांनी 3 जून 1971 रोजी इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्यांची तीन वर्षांनी म्हणजेच 1974 साली त्यांना प्रूडेंशियल कपसाठी पाकिस्तानच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली.
इम्रान खान यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर इम्रान यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ समाजासाठी अनेक गोष्टी केल्या
इम्रान खान यांनी समाजसेवा सुरूच ठेवली आणि 1996 मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTE) स्थापन करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला.
इम्रान खान यांनी 2013 मध्ये लढवलेल्या निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झाला होता.
इम्रान खान यांनी तीन वेळा विवाह केला आहे.