Sunita Williams : तिनं 9 महिने अंतराळात काढले, पण ओव्हरटाईम फक्त 347 रुपये; सुनीता विल्यम्सला पैसे किती मिळणार?

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सुनीता विल्यम्स आणि बिच विल्मोर यांना बोइंग स्टारलाईन स्पेसक्राफ्टच्या साहाय्याने 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर पाठवले होते. मात्र, दोघांना तिथे उडकून आता 9 महिन्यांचा कालावधी उलटलाय. मात्र, आता सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार असल्याचे निश्चित झाले. पुढच्या काही तासांमध्ये दोघेही पृथ्वीवर परतणार आहेत. दरम्यान, एवढा अधिकचा कालावधी अंतराळात घालवल्यानंतर नासाकडून त्यांना ओव्हरटाईम म्हणून पैसे देणार का? असा सवालही उपस्थित केला जातोय. जाणून घेऊयात नासाचं सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सामान्यपणे कोणत्याही कंपनीत जास्तीचा वेळ काम केल्यास ओव्हरटाईम दिला जातो. पण हे अंतराळवीरांना लागू होत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. अंतराळ संशोधनासाठी गेलेल्या अंतराळवीरांना जास्तीच्या कामासाठी कोणताही ओव्हरटाईम देत नाही. मात्र, 4 डॉलरची मदत निश्चितपणे दिली जाते.

नासाचे अंतराळवीर पगारी नोकरदार आहेत आणि ते जीएस 15 सॅलरी ग्रेडच्या अंतर्गत येतात. त्यांना वर्षाला 125, 133 डॉलर पासून 162,672 डॉलर पर्यंत पगार मिळतो. ही भारतीय चलनात रुपांतरीत केल्यास 1.08 कोटी पासून 1.41 कोटींपर्यंत होऊ शकते. मोठं रिस्क आणि बिझी शेड्युल, मोठ्या कालावधीचा एकांतवासाला सामोरे जाऊन सुद्धा त्यांना ओव्हरटाईम दिला जात नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सर्वात लोकप्रिय असलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची संपत्ती जवळपास 5 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार ती 43 कोटींपेक्षा जास्त आहे. अंतराळ जात असताना संबंधित अंतराळवीरांना खर्च, परिवहन, जेवण आणि निवास यासंबंधीचा सर्व खर्च दिला जातो. केवळ अंतराळातच नाही तर पृथ्वीवर अभ्यास करत असाताना देखील या सुविधा मिळतात.
जर भरपाई द्यायची असेल तर ती अनपेक्षित खर्च झाल्यास दिली जाते. जी फक्त 4 डॉलर प्रतिदिवस आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार केवळ 347 रुपये प्रतिदिवस आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 300 दिवसांच्या हिशोबाने 1 लाख 4 हजार रुपये दिले जाऊ शकतात. मात्र, नासाकडून याबाबत स्पष्टपणे सांगण्यात येते की, नासा वैयक्तिक खर्चासाठी हे पैसे देते. ओव्हरटाईम नाही.