In Pics | सुएज कॅनॉलमध्ये फसलं महाकाय जहाज, समुद्रातही ट्रॅफिक जॅम
इजिप्तचा सुएज कॅनॉल म्हणजे समद्रातील 193.3 किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कॅनॉलवर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्दे झाली आहेत. सध्या सुएज कॅनॉल इजिप्तच्या ताब्यात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुएज कॅनॉल भूमध्य सागरला लाल समुद्राशी तसेच अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो. म्हणजेच आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो.
चीनमधून माल भरुन एक जहाज नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कॅनॉलमध्ये फसलं. चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे 400 मीटर लांबीचं आणि 59 मीटर रुंदीचं जहाज या कॅनॉलमध्ये फसलं.
समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं. त्यामुळे या कॅनॉलमध्ये जहाज अडकलं.
त्यामुळे समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झाल्याचं पहायला मिळतंय. हा मार्ग आता खुला होण्यासाठी काही दिवस लागतील असं सांगण्यात येतंय.
याच रस्त्याने सर्व लहान-मोठे जहाजं प्रवास करतात. हा समुद्री मार्ग जर मोठ्या काळासाठी बंद राहिला तर या जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोप ते आशिया असा प्रवास करावा लागेल.