भयावह! आइसलॅंडमध्ये 800 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक, 32 किमी दूर अंतरावरूनही दिसतायत ज्वाळा
आइसलँडमध्ये काल ज्वालामुखीचा उद्रेक झाला, आइसलँडची राजधानी रिकाविकपासून सुमारे 32 किमी अंतरावरूनही या ज्वालामुखीच्या ज्वाळा दिसत होत्या. Source : Twitter @CaptIceland
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान खात्याच्या माहितीनुसार, आइसलँडची राजधानी रेकाविक येथे असलेल्या रिक्नायस पेनिनसुला येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
Source : Twitter @PresstvFr
फॅग्राडाल्स डोंगरावर हा ज्वालामुखी सुमारे 800 वर्षांपासून फुटला नव्हता. मात्र आता त्यातून आगीच्या उंचच उंच ज्वाळा बाहेर येत आहेत. Source : Twitter @earthtimes24
या ज्वालामुखीची व्याप्ती इतकी मोठी आहे की हा तब्बल 32 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणाहूनही स्पष्टपणे दिसतोय. आइसलॅंडमधील रहिवाशी क्षेत्रापासून याचं अंतर लांब आहे.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी भूकंप झाला होता, ज्यामुळे ज्वालामुखी फुटण्याची शक्यता होती. त्याच वेळी स्फोट होण्यापूर्वी भूकंपाची क्रिया देखील थांबविली गेली होती.
Iceland Volcano Eruption | Image Source : twitter @TheAtlPhoto
ज्वालामुखीमुळे अद्याप कोणतेही क्षेत्र रिकामे करण्यास सांगण्यात आले नाही. मात्र लोकांना जागरुक राहण्याचं व घरांच्या खिडक्या-दरवाजे बंदच ठेवण्यास सांगितले आहे.