Burj Khalifa Downtown Circle : 'बुर्ज खलिफा'च्या आजूबाजूला जमिनीपासून 550 मीटर उंचीवर बांधली जाणार एक महाकाय रिंग; पाहा फोटो!
Znera Space या आर्किटेक्चरल कंपनीने बुर्ज खलिफाभोवती रिंग बनवण्याची ही संकल्पना तयार केली आहे. इंस्टाग्रामवर या डिझाइनचे फोटो शेअर केले आहेत. झनेरा स्पेसच्या नजमुस चौधरी आणि निल्स रेमेस या दोन कलाकारांनी हे डिझाइन तयार केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुर्ज खलिफाभोवती 550 मीटर उंच रिंग बांधण्यात येणार आहे. ही संकल्पना 'डाऊनटाऊन सर्कल' म्हणून ओळखली जाईल.
बुर्ज खलिफाभोवती 550 मीटर उंच रिंग बांधण्यात येणार आहे. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, या रिंगचा घेर तीन किलोमीटर असेल. ही रिंग डाऊनटाऊन सर्कल म्हणून ओळखले जाईल.
आर्किटेक्चरल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही रिंग एक मेगा बिल्डिंग कॉम्प्लेक्स असेल. ज्याने पर्यावरणाचीही हानी होणार नाही अशा एक हाइपर एफिशियंट अर्बन सेंटरची निर्मिती करणे हाच त्याच्या मागचा उद्देश असेल.
द नॅशनल न्यूजनुसार, ही रिंग लहान युनिटमध्ये विभागली जाईल. या रिंगच्या आत घरे, पब्लिक स्पेस, कमर्शियल स्पेस आणि कल्चरल स्पेस असतील.
बुर्ज खलिफाभोवती हे डाऊनटाऊन सर्कल तयार करण्याची कल्पना महामारीच्या काळात उदयास आली.
कंपनीने स्कायपार्क बांधण्याचीही योजना आखली आहे. त्याच्या आत विविध प्रकारचे नैसर्गिक देखावे रिक्रिएट करण्याचा प्लॅन आहे.
या स्कायपार्कमध्ये अनेक प्रकारची झाडे, वाळूच्या टेकड्या, दऱ्या, धबधबे बनवल्या जाणार आहेत.
डाऊनटाऊन सर्कलमध्ये पाच स्तर असणार आहेत जे जमिनीवर बांधलेल्या खांबांवर आधारित असतील.
सर्किटच्या मोठ्या विस्तारामध्येच दोन मुख्य रिंग असतील ज्याला स्कायपार्क नावाच्या हिरव्या पट्ट्याने जोडलेले असेल.
डाऊनटाऊन सर्कल प्रकल्प हा 550-मीटर-उंच रिंग आहे जो बुर्ज खलिफाला घेरणार आहे. डिझायनर्सचा असा विश्वास आहे की टॉवर निवासस्थानांच्या पारंपारिक कल्पनांना हा प्रोजेक्ट आव्हान देईल.