PHOTO : सिंगापूरची 'विना चालक' सार्वजनिक बस पाहिलीय का? ही आहेत तिची खास वैशिष्ट्ये
नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या सिंगापूर आता 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतूकीकडे पाऊल टाकलं आहे. सिंगापूरमध्ये पहिली सार्वजनिक ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे. (photo by getty images)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवातीचे तीन महिने ही बस ट्रायल बेसवर चालणार आहे. सिंगापूरच्या या ड्रायव्हरलेस बसबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. (photo by getty images)
बसचा कमाल वेग हा ताशी 25 किमी इतका आहे. त्यामुळे वळण घेतानाही एकदम आरामशीर पद्धतीने वळण घेतलं जातं. (photo by getty images)
या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून बुकिंग करावं लागणार आहे. त्यानंतरच ते हवं त्या ठिकाणी प्रवास करु शकतात. (photo by getty images)
सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये ट्रायल बेसवर या बसचं परिक्षण करण्यात येत असल्याने यामध्ये ड्रायव्हर असणार आहे. आवश्यक असेल तिथे हा ड्रायव्हर हस्तक्षेप करेल. (photo by getty images)
विना ड्रायव्हर बस आणि वाहनांमुळे परदेशी कर्मचाऱ्यावंरचं अवलंबन कमी होणार असल्याचं सिंगापूरच्या प्रशासनाचं मत आहे. (photo by getty images)
सिंगापूरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ही ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे.(photo by getty images)