Richest Pets in the World : कोणी कोट्यधीश, तर कोणी अब्जाधीश; जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी
काही खेळाडू आणि सेलेब्रिटीही त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत येतात. पण तुम्ही कोट्यवधींचे मालक असलेल्या पाळीव प्राण्यांबद्दल ऐकलं आहे का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पाळीव प्राण्यांची संपत्ती सर्वसाधारण माणसांपेक्षाही अधिक आहे. यांची संपत्ती ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल, एवढं मात्र नक्की.
यामध्ये पॉपस्टार टेलर स्विफ्टच्या लाडक्या मांजरीचाही तिसरा क्रमांक आहे. जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी कोणते आहेत आणि त्यांची संपत्ती जाणून घ्या.
गुंतर IV (Gunther VI) नावाचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे. गुंतर IV हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे.
ओप्रा विन्फ्रे हिच्या मृत्यूपत्रात 30 दशलक्ष डॉलर संपत्ती या कुत्र्यांच्या नावावर आहे. या संपत्तीसह हे कुत्रे जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
नाला (Nala) नावाची मांजर जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. AllAboutCats.com या वेबसाईटनुसार, नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर आहे.
नाला या मांजरीची संपत्ती सुमारे 100 दशलक्ष डॉलर आहे. एवढेच नाही तर ही मांजरीचे 4.4 दशलक्ष फॉलोअर्स असून ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मांजर आहे. नाला या मांजरीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे.
ग्रॅमी पुरस्कार विजेती पॉपस्टार (Hollywood Singer) टेलर स्विफ्टची (Taylor Swift) मांजर ऑलिव्हिया बेन्सन (Olivia Benson) ही जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलिव्हिया बेन्सन या मांजरीची संपत्ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया 97 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 800 कोटीची मालकीण आहे. टेलर स्विफ्टकडे तिची पाळीव मांजर ऑलिव्हिया 2014 पासून आहे. ऑलिव्हिया ही एक स्कॉटिश फोल्ड फेलाइन जातीची मांजर आहे.
सँडी, सनी, ल्यूक, लॉरेन आणि लॅला या कुत्र्यांच्या क्रमांक सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकन टॉक शो होस्ट (American Talk Show Host) ओपेरा विन्फ्रेचे (Oprah Winfrey) हे पाळीव कुत्रे आहेत.
पोमेरेनियन कुत्रा जिफपॉम (Jiffpom) जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जिफपॉमचे इंस्टाग्रामवर 9.5 दशलक्ष (9.5 Million) फॉलोअर्स आहेत.
जिफपॉम एक इंटरनेट स्टार देखील आहे. जिफपोम या पाळीव कुत्र्याची सुमारे 25 दशलक्ष डॉलर एवढी मालमत्ता आहे.