Sun Flare : सौरवादळामुळे सूर्यावर मोठा स्फोट, लाखो हायड्रोजन बॉम्बएवढा धमाका
सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने काही दिवसांपूर्वी सूर्यावरील या स्फोटाची शक्यता वर्तवली होती. (PC : istockphoto)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर झाला आहे. हा आतापर्यंतचा चार वर्षांतील सर्वात मोठा सोलर फ्लेअर स्फोट असल्याचे मानले जाते. (PC : istockphoto)
सूर्य (Sun) सौरमालेतील मुख्य ऊर्जा स्त्रोत आहे. सूर्याचा सूर्यमालेतील इतर ग्रहांवर परिणाम होत असतो. (PC : istockphoto)
सूर्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला एक सनस्पॉट होता, त्यावर स्फोट झाला. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. (PC : istockphoto)
हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. अटलांटिक महासागरावरील शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउटमुळे पृथ्वीवरील सौरवादळाचे परिणाम जाणवले. (PC : istockphoto)
सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही नासाने आपल्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेचा वापर करून सौरवादळाची फोटो टिपला होता. (PC : istockphoto)
सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या सौर ज्वाळा (Sun Flare) तयार होतात यालाच सौर स्फोट (Sun Explosion) किंवा सौरवादळ (Sun Strom) असे म्हणतात. (PC : istockphoto)
सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. (PC : istockphoto)
सूर्यावरील चुंबकत्वामुळे तापमान वाढून हे स्फोट होतात. या स्फोटामुळे नंतर सौर वादळ तयार होतं. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात (PC : istockphoto)
या सौर ज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो. (PC : istockphoto)