Thailand Tour : IRCTC ची थायलंड टूर, फक्त 'या' रकमेत बँकॉक-पटायाची धम्माल सफर
आयआरसीटीसी (IRCTC) ने उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या लोकांसाठी खास टूर पॅकेज आणलं आहे. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयआरसीटीसीच्या या खास थायलँड पॅकेजमध्ये तुम्हाला बँकॉक आणि पटायाला फिरण्याची संधी मिळत आहे. (Image Source : istock)
हिवाळ्याची चाहूल लागली आहे. जर तुम्ही या हिवाळ्याच्या हंगामात तुमच्या कुटुंबासह थायलंडला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही IRCTC च्या या खास पॅकेजमध्ये बुक करू शकता. (Image Source : istock)
आपल्या देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंडने अलीकडेच भारतीयांसाठी सहा महिन्यांच्या व्हिसा फ्री प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (Image Source : istock)
आता IRCTC थायलंड टूर पॅकेज आणलं आहे. हे एक फ्लाइट टूर पॅकेज आहे, यामध्ये तुम्हाला लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉकसाठी थेट विमान असेल. यानंतर पटायाला जाण्यासाठी तुम्हाला अडीच तासांचा प्रवास पूर्ण करावा लागेल. (Image Source : istock)
या पॅकेजमध्ये तुम्हाला 4 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळेल. हे हॉटेल शेअरिंग तत्त्वावर उपलब्ध असेल. पॅकेजमध्ये तुम्हाला कोरल आयलंड टूरवर जाण्याचीही संधी मिळेल. (Image Source : istock)
याशिवाय या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला बँकॉक आणि पटायाच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला इंग्रजी भाषिक टुरिस्ट गाईड देखील मिळेल. (Image Source : istock)
परतीच्या प्रवासासाठी, तुम्हाला बँकॉक ते लखनौ विमानाचे तिकीट मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. (Image Source : istock)
हे संपूर्ण पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीचे आहे, यामध्ये तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 60,300 रुपये, जोडीने प्रवास करण्यासाठी 60,300 रुपये आणि तीन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 55,200 रुपये मोजावे लागतील. (Image Source : istock)
तुम्ही परदेश वारीच्या विचारात असाल, तर हा उत्तम पर्याय आहे. (Image Source : istock)