Exit Poll 2024
(Source: {)
Earthquake Nepal: रस्त्यांना भल्यामोठ्या भेगा, घरं, इमारती जमीनदोस्त; एका महिन्यात तिसऱ्यांदा हादरलं नेपाळ, PHOTOS
Nepal Earthquake: नेपाळमध्ये शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 तीव्रतेचा भूकंप आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यामुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या भूकंपांच्या फोटोंमधून भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळचे विचलित करणारं दृश्य पाहायला मिळतंय.
नेपाळमध्ये रस्ते, घरं, इमारतींचं मोठं नुकसना झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रात्री अकरा वाजून 32 मिनिटांनी नेपाळ हादरलं, भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. घाबरून लोक घराबाहेर पडले.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान (NCS) नं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये अयोध्येपासून जवळपास 227 किलोमीटर उत्तर आणि काठमांडूपासून 331 किलोमीटर पश्चिम उत्तर-पश्चिमेकडे 10 किलोमीटर खोल होतं.
नेपाळमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा तीव्र भूकंप आला आहे.
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळं भारतातही हादरे बसले. दिल्ली, नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक घराबाहेर पडले.
नेपाळमधील हा भूकंप रात्री झाला असल्यानं दिवसा नुकसानीची अधिक चित्रं पाहता येतील. हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी इंद्रजीत सिंह म्हणाले, आम्ही टीव्ही पाहत असताना आम्हाला बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले. गाझियाबादचे रहिवासी गोपाल यांनी सांगितलं की, 15 सेकंदांपेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवले.
उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना येथे भूकंपाचे धक्के जाणवले.