Puya raimondi : या वनस्पतीला 100 वर्षातून एकदाच फुले येतात,जाणून घ्या या वनस्पतीबद्दल
जगात हजारो प्रजातीच्या झाडे आणि वनस्पती आढळतात. परंतु काही वनस्पती त्यांच्या वेगवेगळ्या कृतींसाठी ओळखल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आम्ही तुम्हाला अशा झाडाविषयी देखील सांगणार आहोत, जिला 100 वर्षातून एकदाच फुले येतात.
अशी अनेक झाडे आणि वनस्पती निसर्गात आढळतात,जी अतिशय अद्वितीय आहेत. भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक ठिकाणी झाडे आणि वनस्पती आढळतात.
पण आज आम्ही तुम्हाला एका वनस्पतीबद्दल सांगणार आहोत जी खूप वेगळी आहे तिचे नाव आहे पुया रायमोंडी. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही वनस्पती 100 वर्षांतून एकदाच फुलते.
सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, पुया रायमोंडी ही एक दुर्मिळ आणि प्रचंड वनस्पती आहे, जी शतकातून एकदाच फुलते. त्यामुळे बहुतेक लोकांना ही दुर्मिळ संकटग्रस्त वनस्पती फुलताना पाहण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते.
या वनस्पतीला अँडीजची राणी असेही म्हणतात. जेव्हा वनस्पती सुमारे 80 ते 100 वर्षे वयापर्यंत पोहोचते तेव्हाच ते फुलते.
ही वनस्पती उंच ठिकाणी वाढते पुया रायमंडी हे साधारणपणे कॅक्टससारखी दिसते. हे दक्षिण अमेरिकेत 12,000 फूट उंचीवर वाढते. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील बोटॅनिकल गार्डनचे संचालक पॉल लिच यांनी सीबीएस सॅन फ्रान्सिस्को न्यूजला सांगितले की वनस्पती खराब मातीसह थंड आणि कोरड्या परिस्थितीत वाढू शकते. पेरुनार्थच्या अहवालात असे म्हटले आहे की पुया रायमोंडी हे जगातील सर्वात मोठे ब्रोमेलियाड आहे.
याशिवाय,हे जगातील सर्वोच्च फ्लॉवर स्पाइक देखील आहे.रोपाला परिपक्व होण्यासाठी किती वेळ लागतो हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे.
पुया रायमंडी 33 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. त्यावर फुले उमलली की ती खूप सुंदर दिसते. कारण त्यावर हजारो पांढरी फुले उमलतात. एकदा झाडाला फुले आली की ती सुकते आणि नंतर मरते. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका झाडावर 8 हजार ते 20 हजार फुलं फुलू शकतात.