Traveling tips : फिरायला जात आहात? या गोष्टी सोबत न्यायला विसरू नका!
फिरायला जाणे हा अनेकांचा आवडता छंद. काम ,कार्यक्रम,सहल अशा कोणत्यातरी कारणाने आपण बाहेर जात असतो . अशा वेळी सोबत काय सामान न्यावे याबद्दल तुम्ही गोंधळात पडत असाल तर पुढे आम्ही सांगणार आहोत या गोष्टी सोबत घेऊन जा, जेणेकरून प्रवासात अडचण येणार नाही. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मार्ट पॅकिंग- पॅकिंग करताना, हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही तुमच्यासोबत असे कपडे घेऊ नका जे खूप हलके रंगाचे असतात आणि ते सहज घाण होतात, यामुळे तुम्हाला कपडे पुन्हा पुन्हा धुण्याच्या समस्येपासून वाचता येईल. [Photo Credit : Pexel.com]
याशिवाय काही कपडे सोबत ठेवा जे तुम्ही मिक्स आणि मॅचिंग करून घालू शकता. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रयत्नाशिवाय स्टायलिश दिसू शकाल आणि तुम्हाला जास्त कपडे कॅरी करण्याची गरज भासणार नाही. [Photo Credit : Pexel.com]
चप्पल ,शूज अशा प्रकारे निवडा की तुम्ही ते प्रत्येक ड्रेससोबत घालू शकाल आणि जे आरामदायकही असेल. [Photo Credit : Pexel.com]
कमी सामान- आपण कुठेही जातो तिथे खरेदी करतो आणि नेहमी काहीतरी आठवण म्हणून परत आणतो, त्यामुळे कमी सामान घेऊन गेलात तर बरे होईल जेणेकरून थोडी जास्त खरेदी केली तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही . [Photo Credit : Pexel.com]
औषधे - अनेक वेळा बाहेर गेल्यावर थकवा, हवामान किंवा आहारातील बदलामुळे अपचन, लूज मोशन, सर्दी, ताप यासारख्या समस्या उद्भवू लागतात. [Photo Credit : Pexel.com]
अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन खबरदारी म्हणून काही औषधे सोबत ठेवल्यास बरे होईल.प्राथमिक उपचारासाठी आवश्यक लागणारे मेडिकल सोबत घेऊन जावे. [Photo Credit : Pexel.com]
हॉटेल बुक करा - आपण नवीन ठिकाणी जातो आणि हॉटेल मिळण्यात अडचण येते, हे टाळण्यासाठी हॉटेलचे प्री-बुकिंग करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चांगल्या टूर पॅकेजचाही लाभ घेऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
यासोबतच तुम्ही ज्या हॉटेलमध्ये रहात आहात त्याबद्दल तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना माहिती देणेही महत्त्वाचे आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे. [Photo Credit : Pexel.com]
पैसा- प्रवास करताना लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जास्त रोख किंवा मौल्यवान वस्तू बाळगू नका आणि तुमचे कार्ड (डेबिट, क्रेडिट) सुरक्षित ठेवा. [Photo Credit : Pexel.com]
याशिवाय कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नका हे लक्षात ठेवा.महागड्या वस्तु सोबत ठेवल्यास त्या गहाळ होण्याची शक्यता असते . [Photo Credit : Pexel.com]
खबरदारी - तुम्ही कुठेही जात आहात त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकाल. मुलींनी सुरक्षेबाबत जागरुक असणे आणि मिरचीचा स्प्रे सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे. [Photo Credit : Pexel.com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]