Princess Diana 60th Birthday: विन्फ्रेच्या वादग्रस्त मुलाखतीनंतर प्रिन्स विल्यम आणि हॅरी आईच्या सन्मानासाठी पुन्हा एकत्र
या वर्षाच्या सुरूवातीच्या काळात प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलच्या वादग्रस्त ओप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीनंतर प्रिन्स विल्यम आणि हॅरी पहिल्यांदाच एकत्र दिसले. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रिन्सेस डायनाच्या यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी दोघा भावांची बॉन्डिंग पाहायला मिळाली. या खास दिवशी प्रिन्स विलियम आणि हॅरी यांना त्यांची आई प्रिन्सेस ऑफ वेल्सचा सन्मान केला. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
प्रिन्सेस डायना यांच्या पुतळ्यामध्ये त्यांची माणुसकीची बाजू दाखवण्यात आली असून केन्सिंग्टन पॅलेसच्या सनकेन गार्डनमध्ये उभा आहे. राजकुमारी डायना यांचा पुतळा आता पाहुणे आणि लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “आज, आमच्या आईच्या 60 व्या वाढदिवसाच्या वेळी आम्ही तिचे प्रेम, ताकद आणि चारित्र्य लक्षात ठेवतो. ज्यामुळे जगभरातील चांगल्या गोष्टी आणि असंख्य आयुष्य बदलली आहेत. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
यावेळी दोघा भावांना आपल्या आईची आठवण झाली आणि एका निवेदनात ते म्हणाले, की “दररोज आम्ही अशी इच्छा करतो की ती अजूनही आमच्याबरोबर असते आणि आम्हाला आशा आहे की हा पुतळा तिच्या आयुष्याचे आणि तिच्या वारशाचे प्रतीक म्हणून कायमचे पाहिले जाईल.” (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीस, मेघन मार्कल आणि हॅरी ओप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहिले, ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण त्यांनी राजघराण्याविषयी काही धक्कादायक माहिती उघड केली होती. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
या जोडप्याने शाही घराण्यातील एका सदस्याबद्दल भाष्य केलं होतं. ज्याला त्यांचा मुलगा आर्चीच्या त्वचेच्या रंगाबद्दल चिंता होती. हॅरी आणि मेघन यांनी या सदस्याचे नाव सांगण्यास नकार दिला होता. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)
या महिन्याच्या सुरुवातीलाच हॅरी आणि मेघन यांनी त्यांच्या दुसरं अपत्य म्हणून मुलीचे स्वागत केले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव राणी एलिझाबेथ आणि दिवंगत आई प्रिन्सेस डायना यांच्या नावावरुन लिलिबेट 'लिलि' डायना माउंटबॅटन-विंडसर ठेवले आहे. (फोटो सौजन्य - एएफपी प्रतिमा)