In Pics : तीन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन 'ममी'वर CT scan चा प्रयोग, रहस्य उलघडणार?
इजिप्तचे पिरॅमिड्स आणि त्यातील ममी म्हणजे एक प्रकारचं गूढच आहे. अशाच एका तीन हजार वर्षांपूर्वीच्या ममीचे CT scan तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Photo : REUTERS/Flavio Lo Scalzo
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइटलीतील हा प्रयोग ऐतिहासिक संशोधानाचा एक भाग असून त्यामुळे ममी संबंधी रहस्यांचा मोठा खजाना उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Photo : REUTERS/Flavio Lo Scalzo
ही ममी अंखेखोन्सू (Ankhekhonsu) नावाच्या एका धर्मगुरुची असून ती इसवी सन पूर्व 900 ते इसवी सन पूर्व 800 या काळातील आहे. 'अंखेखोन्सु देवता जिवंत आहे' असं पाच वेळा त्या शवपेटीवर कोरण्यात आलं आहे. Photo : REUTERS/Flavio Lo Scalzo
या ममीला इटलीतील बर्गामो शहरातील सिव्हिक आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये जतन करुन ठेवण्यात आलं होतं. Photo : REUTERS/Flavio Lo Scalzo
या ममीवर संशोधन सुरु असून मिलान शहरातील पॉलिक्लिनिको हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर तीन दिवसांपूर्वी CT scan तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. Photo : REUTERS/Flavio Lo Scalzo
या ममीचे CT scan केल्याने तिच्या जीवन आणि मृत्यूसंबंधी माहिती तसंच त्याला पिरॅमिडमध्ये ठेवण्यापूर्वी कपड्यात गुंडाळून ठेवताना कोणकोणत्या गोष्टींचा वापर करण्यात आला होता याचा उलघडा होईल असं या संशोधकांना वाटतंय. Photo : REUTERS/Flavio Lo Scalzo
आधुनिक वैद्यकीय संशोधनासाठी प्राचीन रोग आणि जखमांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे असं या ममी रिसर्च प्रोजेक्टच्या प्रमुख सबिना माल्गोरा म्हणाल्या. Photo : REUTERS/Flavio Lo Scalzo