PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची गळाभेट, व्हाईट हाऊसवर पंतप्रधानांचं भाषण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करण्यासाठी पंतप्रधान व्हाईट हाऊसवर पोहचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेला देखील संबोधित करणार आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा 140 कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचं देखील म्हटलं.
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर जमलेल्या लोकांना अभिवादन केले.
पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'दोन्ही देशांच्या विविधतेवर गर्व आहे. दोन्ही देशांचा सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय या सिध्दांतावर विश्वास आहे.'
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीच्या मूल्यांवर आधारलेले आहेत.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून अनेक विषयांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत त्यांनी अनेक मुद्द्यांवर देखील चर्चा केली आहे.