PM Modi US Visit : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलॉन मस्कसह अनेक टेक दिग्गजांची घेतली भेट, या मुद्यांवर झाली चर्चा
यादरम्यान बुधवारी 21 जून रोजी मोदींनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील नामवंक नामवंत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या गटाचीही भेट घेतली आहे. हे शिक्षणतज्ज्ञ कृषी, विपणन, अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा क्षेत्रांशी संबंधित आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींनी भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका, संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांचीही भेट घेतली.यादरम्यान फाल्गुनीचे कुटुंबीयही पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी तिच्यासोबत आले होते.
पंतप्रधान मोदींनी चंद्रिका टंडन यांचीही भेट घेतली. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या टंडन स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या संचालक चंद्रिका टंडन यांची भेट घेतल्यानंतर पीएमओकडून एक ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये असं लिहिलंय की,विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांना प्रोत्साहन देण्याचा टंडन यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
यादरम्यान प्राध्यापक पॉल रोमर यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर व्यापक चर्चा केली आहे. ते पुढे म्हणाले की, आमची शहरे अधिक टिकाऊ आणि लोकांसाठी कशी अनुकूल बनवता येतील.
कृषी शास्त्रज्ञ, प्रा. रतन लाल म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी हवामान बदलांवर चर्चा केली. ते पुढे म्हणाले, आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे भारताची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल.
पंतप्रधानांनी अमेरिकन गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक नसीम निकोलस तालेब यांचीही भेट घेतली. प्रा. तालेबसोबतच्या संभाषणात मोदींनी त्यांना भारतातील तरुण उद्योजकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि देशातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टमबद्दल चर्चा केली आहे.
पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. अमेरिकेला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केलं होतं की, मी न्यूयॉर्क शहरात उतरलो आहे. इथल्या कार्यक्रमांची आतुरतेनं वाट पाहत आहोत,ज्यात विचारी नेत्यांशी चर्चा आणि 21 जून रोजी योग दिनाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे.