PM Modi in US: रशिया-युक्रेन युद्ध, भारत-अमेरिका संबंध... अमेरिकेच्या संसदेत 'नमो नमो'; मोदींच्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज ते मायदेशी परतणार आहेत. यादरम्यान त्यांनी अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत बोलताना सांगितलं की, मी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलो, तेव्हा भारत जगातील दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आज भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
पंतप्रधान म्हणाले की, भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. आम्ही त्या दिशेनं वेगानं पावलं टाकत आहोत. जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हा संपूर्ण जगाचीही प्रगती होत असते.
रशिया-युक्रेन युद्धाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे युद्धाची वेळ नाही. ही वेळ संवाद साधण्याची आणि डिप्लोमेसीची आहे. इतकंच नाही तर ही वेळ रक्त सांडण्याची नसून मानवाच्या रक्षणाची आहे.
मोदी म्हणाले की, आमचा दृष्टीकोण 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' आहे. आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्याकडे 2055 हून अधिक राजकीय पक्ष आहेत. भारताच्या विविध राज्यांमध्ये जवळपास 20 वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असून त्यांच्यामार्फत कारभार चालतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे 21व्या शतकातील सर्वात महत्त्वाचं नातं आहे. दोन्ही देशांनी आज घेतलेले निर्णय पुढील पिढ्यांचं भविष्य ठरवतील.
व्हाईट हाऊसनं एका निवेदनात म्हटलं आहे की, या भेटीमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील घनिष्ठ भागीदारी आणि कौटुंबिक आणि मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील.