In Pics : ज्वालामुखीतून धगधगता लाव्हारस बाहेर आला आणि सुरु झाला संघर्ष जीव वाचवण्याचा...
पूर्व कांगोमध्ये तब्बल दोन दशकांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक खेड्यांवर याचे थेट परिणाम झाले आहेत. या संकटामध्ये तब्बल 500हून अधिक घरं नष्ट झाली आहेत. (छाया सौजन्य- @and_rafiki)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे. (छाया सौजन्य- @and_rafiki)
युनिसेफनं दिलेल्या माहितीनुसार कांगोतील गोमा या शहरानजीक असणारा ज्वालामुखी माऊंट नीरागोंगोचा शनिवारी उद्रेक झाला. (छाया सौजन्य - @einarfalur)
ज्यामुळं जवळपास 5 हजार नागरिकांना गोमा सोडत स्थलांतरीत व्हावं लागलं. तर, इतर 25 हजार नागरिकांनी येथील उत्तर पश्चिमेकडे असणाऱ्या साके शहरात शरण घेतली. (छाया सौजन्य- @and_rafiki)
सदर संकटानंतर 170 मुलं बेपत्ता असल्याचं कळत आहे. युनिसेफच्या माहितीनुसार अशा मुलांच्या मदतीसाठी या भागात शिबिरी लावण्यात येती ज्यांना कोणाचाही आधार नाही आणि या संकटाच्या कचाट्याच ते एकटे पडले आहेत. (छाया सौजन्य- @and_rafiki)
या संकटात भारतीय लष्कराच्या तुकडीनंही मदतीचा हात पुढे केला आहे. (छाया सौजन्य - @einarfalur)
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि या भागात धूर, धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं, क्षणार्धात धगधगत्या लाव्हारसाने सर्वकागी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आणि जीव वाचवण्याच्या आक्रोशानं इथं एकच गोंधळ पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- @einarfalur)