PHOTO : तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर होणार अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून त्यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता सत्तेचं शांततेच्या मार्गाने हस्तांतरण करण्याची तयारी दर्शवली आहे. (photo by getty images)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतालिबानच्या कोणत्या नेत्याकडे सत्तेची कमान जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादार याचं नाव सर्वांत पुढं येत आहे. राष्ट्रपती पदासाठी त्याच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (photo by getty images)
अफगाणिस्तानमध्ये 1994 साली ज्या चार लोकांनी तालिबानची स्थापना केली त्यापैकी एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. तो सध्या तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे.(photo by getty images)
मुल्ला बरादर यांने 1980 च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या सैन्याच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये जिहाद पुकारला होता. नंतरच्या काळात 1996 साली तालिबानने अफगाणिस्तानचे सरकार उलथवून आपली सत्ता स्थापन केली. (photo by getty images)
सन 2001 साली अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये आले आणि त्यांनी तालिबानला सत्तेतून बाजूला सारलं. त्यावेळी अमेरिकन सैन्याच्या विरोधात मोठं बंड झालं, त्याचं नेतृत्व मुल्ला बरादर याने केलं होतं. (photo by getty images)
सन 2010 साली अमेरिका आणि पाकिस्तानच्या एका संयुक्त कारवाईत मुल्ला बरादर याला कराचीतून अटक करण्यात आली होती. 2013 साली त्याला सोडून देण्यात आलं. (photo by getty images)
सन 2018 साली अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी कतारमध्ये तालिबानने आपलं कार्यालय सुरु केलं. त्यावेळी मुल्ला अब्दुल गनी बरादरला राजकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं. (photo by getty images)
अशरफ घणी यांच्याकडे आता काहीच पर्याय नसून त्यांनीही आपली सत्ता सोडण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तामध्ये सरकार अस्तित्वात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (photo by getty images)