Haiti Earthquake : कोरोना, राष्ट्रपतींची हत्या, अफाट गरिबी अन् आता भूकंप; हैतीच्या दुर्दशेची भीषण चित्रं
हैती या कॅरेबियन देशात 7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. (PHOTO : @PTIGallery)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात आतापर्यंत 724 लोकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. (PHOTO : @PTIGallery)
भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्थ झालं आहे. तसेच अनेकजण अद्यापही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. (PHOTO : @PTIGallery)
शनिवारी भूकंपामुळे हैतीमधील अनेनक शहरं उद्ध्वस्थ झाली आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळं उद्भवलेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे येते आहेत. (PHOTO : @PTIGallery)
भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून 125 किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून सांगण्यात आलं आहे. (PHOTO : @PTIGallery)
भुकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर काही सौम्य धक्केही जाणवले. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली नागरिकांनी रात्र रस्त्यावरच काढली. (PHOTO : @PTIGallery)
दुसरीकडे पुढच्या आठवड्यात हैतीवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रेस वादळ सोमवार किंवा मंगळवारी हैतीच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. (PHOTO : @PTIGallery)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युएसएड प्रशासक समांथा पॉवर यांची हैतीच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. युएसएड हैतीमधील नुकसानीचा आढावा घेऊन मदत करणार आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे. (PHOTO : @PTIGallery)
(PHOTO : @PTIGallery)
(PHOTO : @PTIGallery)