IN PICS : तालिबानने कब्जा केल्यानंतर आजच्या अफगाणिस्तानचे चित्र कसं आहे?
अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. (Image Source: AP/Zabi Karimi)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे. (Image Source: AP/Zabi Karimi)
अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या बैठकीचे अध्यक्ष असतील. (Image Source: AP/Zabi Karimi)
अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे शांततापूर्ण मार्गाने हस्तांतर करावं असं आवाहन तालिबानने केलं आहे.(Image Source: AP/Gulabuddin Amiri)
त्या आधी तालिबानने कंदहार आणि जलालाबाद ही दोन प्रमुख शहरं ताब्यात घेतली होती. गझनी प्रांताच्या गव्हर्नरच्या निवासस्थानावर तालिबान्यांनी आपला ध्वज फडकवला. (Image Source: AP/Gulabuddin Amiri)
ब्रिटनने आपल्या दूतावासातील अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी 600 सैनिकांची तुकडी पाठवली. (Image Source: AP Photo)
तालिबानने काबुलवर नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर परकीय नागरिकांनी देश सोडण्याला प्राधान्य दिले. (Image Source: AP Photo)
रविवारी उशीरा काबुलमधील अमेरिकेच्या दूतावासासमोर एक मोठा स्फोट घडला. (Image Source: AP/Rahmat Gul)
भारतानेही रविवारी आपल्या 124 नागरिकांना आणि इतर अफगाणी नागरिकांना सुखरुपपणे भारतात परत आणले. अफगाणिस्तामधील परिस्थीती लक्षात घेता भारत सरकारने एयर इंडियाला अद्याप दोन विमानं तयारीत ठेवायला सांगितलं आहे. (Image Source: AP/Dinesh Joshi)