World Elephant Day 2021 : जागतिक हत्ती दिनाचा इतिहास आणि महत्व काय आहे? जाणून घ्या
हत्तींचे संवर्धन करणे, त्याबाबत जनजागृती करणे, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि हत्ती-मानव यांच्यातील संघर्ष कमी करणे यासाठी दरवर्षी 12 ऑगस्टला 'जागतिक हत्ती दिन' साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॅनडाचे चित्रपट निर्माते पेट्रेसिया सिम्स आणि थायलंडच्या एलिफंट रिइन्ट्रोडक्शन फाऊंडेशन या संस्थेने 12 ऑगस्ट 2012 रोजी पहिल्यांदा 'जागतिक हत्ती दिन' साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
हत्ती दंताच्या तस्करीसाठी हत्तींची अवैधपणे शिकार केली जाते. त्यामुळे हत्तींची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. IUCN च्या रेड लिस्ट मध्ये हत्तीचा समावेश 'धोकादायक स्थितीत असलेली प्रजाती' म्हणून करण्यात आला आहे.
भारताने 2010 साली हत्तीला नैसर्गिक वारसा प्राणी म्हणून घोषित केलं. या प्राण्याला आपल्या देशात देवाचाही दर्जा दिलेला आहे.
हत्ती एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर सतत स्थलांतर करत असतो. त्यामुळे त्यांचा मार्ग म्हणजे एलिफंट कॉरिडॉरचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचं असतं.
हत्ती संवर्धनामध्ये जंगलतोड, अतिक्रमण, अधिवास नष्टता, हत्ती दंतासाठी अवैध शिकार या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतंय.
भारतात आशियायी हत्ती आढळतो. भारत हा हत्तींचा अधिवास असलेला जगातला सर्वात मोठा देश आहे. भारतात सध्या 30 हजारांहून जास्त हत्ती आढळत असल्याची नोंद आहे.
भारतातील 22 राज्यांमध्ये हत्तींचा अधिवास असून सर्वात जास्त हत्ती कर्नाटकात सापडतात. भारतात हत्तींच्या संवर्धनासाठी 1992 साली 'प्रोजेक्ट एलिफंट' सुरु करण्यात आला आहे.