PHOTO: दिवसभरातून 10 हजारवेळा झोपणारा पक्षी
हा आहे पक्ष्यांचा 'कुंभकर्ण', जो दिवसातून 10 हजार वेळा डुलकी घेतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा पक्षी जगभरात आपल्या झोपण्याच्या सवयीमुळे प्रसिध्द आहे.
'चिंस्ट्रॅप पेंग्विन असे या पक्षाचे नाव असून, त्याच्या झोपीची नेहमीच चर्चा होते.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, हा पेंग्विन पक्षी दररोज 10 तासांपेक्षा जास्त झोपतो.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका निरीक्षणातून हा पक्षी दिवसातून हजारो डुलक्या घेत असतो.
लियोन न्यूरोसायन्स रिसर्च सेंटर आणि कोरिया पोलर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या टीमने चायनास्ट्रॅप पेंग्विनवर अभ्यास केला आहे.
सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, चिंस्ट्रॅप पेंग्विन जास्त काळ झोपत नाहीत. त्याऐवजी ते वारंवार झोपत असतो. म्हणजेच त्याची एकवेळीची झोप केवळ चार सेकंद असते.
त्यामुळे या पक्ष्याला कुंभकर्ण असेही म्हणतात. कारण तो आळशीपणात सर्वांना मागे टाकतो.