Iraqi Princess : मिशी असलेली सौंदर्यवान राणी! जिच्या प्रेमात बुडाले 145 जण, 13 जणांनी संपवलं आयुष्य
पूर्वी लोक मनाचं सौंदर्य शोधायचे, ते आज शरीराचं सौंदर्य शोधतात. इतिहासातही अशा सुंदर राण्या होऊन गेल्या. यातीलच एक राणी होती इराकच्या काजरची राणी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया राजकुमारीच्या सौंदर्याने इतके लोक आकर्षित झाले होते की, तिच्यासोबल लग्न करण्यासाठी पुरुष काहीही करायला तयार होते.
या राजकुमारीला 145 जण राजकुमारीच्या प्रेमात पडले होते. या राजकन्येसाठी 13 पुरुषांनी आत्महत्या केली होती. कोण होती ती राणी आणि तिनं कोणाशी लग्न केलं? जाणून घ्या.
इराकच्या काजरची राजकन्या झाहरा खानम तदज एस सुल्तानेह हीची ही कहाणी आहे. काजरची ही राजकुमारी सौंदर्याची देवी मानली जात असे. या राणीच्या सौंदर्याची व्याख्याच वेगळी होती.
राजकुमारी झाहरा खानम दिसायला गोरी होती मात्र, आकर्षक नव्हती. ती राजकन्या असल्याने तिचे कुटुंब श्रीमंत होते. तिच्या कुटुंबाची संपत्ती अफाट होती. म्हणून तिच्याकडे पुरुष आकर्षिक व्हायचे असं नव्हतं, तर ही राजकुमारी इराकमधील त्या काळातील सर्वात शिक्षित महिलांपैकी एक होती.
इराकी राजकन्या झाहरा खानमच्या प्रेमासाठी त्याकाळी अनेकांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. 145 जण राजकन्या झाहरा खानम तदज एस सुल्तानेहच्या प्रेमात पडले होते. मात्र, या सर्वांना तिने नकार दिला. नकार सहन न झाल्याने 13 पुरुषांनी आत्महत्या केली होती.
झाहरा खानम ताज एस सुल्तानेह त्या काळातील कर्तत्ववान महिलांपैकी एक आणि प्रसिद्ध राजकुमारी होती. झाहरा खानम इराकच्या काजरची सर्वात शिक्षित राजकुमारी मानली जात असे.
झाहरा खानम करोडो आणि अब्जावधींची मालकीण होती. ती दिसायला फारशी आकर्षक नव्हती, मात्र तरीही शेकडो लोक तिच्यावर मनापासून प्रेम करायचे.
राजकुमारी झाहरा खानमने तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं, त्यानंतर तिने 2 मुले आणि 2 मुलींना जन्म दिला.
राजकुमारी झाहरा खानम राजा नसीर अली दिन शाह काजर होते. 47 वर्षांच्या शासनानंतर इराणच्या सम्राट नासरने 84 विवाह केले आणि राणी झाहरा खानम त्याची सर्वात प्रिय राणी होती.
राणी झाहरा खानमचे पती राजा नसीर अली दिन शाह हे त्याकाळचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जात होते. काजरच्या राजवटीत ते चौथे सर्वात शक्तिशाली राजे असल्याचं म्हटलं जातं.
त्या काळातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये झाहरा खानमची गणना होते. राणी झाहरा खानम यांना चित्रकलेव्यतिरिक्त अनेक कलांची आवड होती. त्याकाळा लठ्ठ महिला सौंदर्यवान मानल्या जायच्या, त्यामुळे ही राणी खूप प्रसिद्ध आणि सुंदर असल्याचं मानलं जात असे.
झाहरा खानम यांना लेखनाचीही खूप आवड होती. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठीही खूप काम केले आणि हिजाब सोडून पाश्चात्य कपडे परिधान करण्याकडे वाटचाल केली.