Photo: पाकिस्तानात वीज संकट, संपूर्ण देश अंधारात
पाकिस्तानची आर्थिक स्थिती एवढी डबघाईला आली आहे की त्या देशाकडे आता वीज केंद्र चालवण्यासाठीही पैसा उरला नाही. परिणामी पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये वीज संकटामुळे अंधार पसरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधीच राजकीय आणि आर्थिक संकटांशी झगडत असलेला, आर्थिक दिवाळखोरीत गेलेल्या पाकिस्तानमध्ये सोमवारी ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज खंडित झाला.
कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि पाकिस्तानातील इतर प्रमुख शहरी केंद्रे वीजेविना अंधारात गेली होती.
ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या या शेजारील देशात गेल्या चार महिन्यांत ही वीज खंडित होणारी दुसरी मोठी घटना घडली आहे.
पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने आज सकाळी ट्वीट केलं. त्यामध्ये म्हटलं होतं की नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये व्यापक बिघाड झाला आहे. परंतु देखभालीचे काम वेगाने सुरू आहे.
नॅशनल ग्रीडची फ्रिक्वेन्सी सिस्टम आज सकाळी 7:34 वाजता खालावली गेली आणि परिणामी या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला.
देशातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या देशातील नागरिकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. पाकिस्तामधील या संकटामुळे सोशल मीडियावर #PowerOutrage हे हॅशटॅग ट्रेन्ड होतंय.
पाकिस्तानच्या या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मीम्स तयार केले जात आहेत आणि ते व्हायरल केले जात आहेत.
एका ट्विटर यूजरने ट्वीट केले की, भावनिक ब्रेक डाउन, मानसिक ब्रेक डाउन, फिजिकल ब्रेक डाउन के बाद पेश-ए-खिदमत हा पॉवर ब्रेकडाउन.
दुसर्याने लिहिले, उर्वरित जगामध्ये मध्यरात्र असल्यामुळे वीज गायब झाली आहे. पाकिस्तानमध्ये वीज खंडित झाली आहे, चला झोपायला जाऊया.