Photo : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, हल्लेखोर अटकेत
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलं असून त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे.
या गोळीबारात इम्रान खान यांच्यासोबतच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून इतर सात जण जखमी झाल्याची माहिती आहे.
हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याने आपण इम्रान खान यांना मारण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली आहे.
इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदीच्या वातावरणातून जात आहे.
इम्रान खान यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता या आधीच अनेकांनी व्यक्त केली होती. आता ती शक्यता सत्यात आली असून पाकिस्तानची राजकीय स्थिती सध्या चिंताजनक बनली आहे.
या आधी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनिझिर भुट्टो यांच्यावर गोळीबार करण्यात आली होती. त्यामध्ये बेनिझिर भुट्टो यांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानी सरकारच्या विरोधात इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा 'लॉंग मार्च'चे (Long March) आयोजन केलं आहे. लाँग मार्चच्या माध्यमातून इम्रान खान यांनी सरकारविरोधात मोर्चा खोलला असून देशातील निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. आज हा मोर्चा गुजरानवाला या ठिकाणी आला होता.