Pakistan Blast: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात बॉम्बस्फोट! 44 जणांचा मृत्यू, 200 जखमी; पाहा फोटो
स्थानिक पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटात सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिळालेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजलची (जेयूआय-एफ) कार्यकर्ता परिषद सुरू असताना मोठा स्फोट झाला. या परिषदेला लक्ष्य करण्यात आल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे.
या पक्षाच्या सभेत 500 हून अधिक लोक उपस्थित होते. पाकिस्तानात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे, अशा परिस्थितीत वेगवेगळे पक्ष आपापल्या संघटना एकत्र करण्यात व्यस्त आहेत.
खैबर पख्तुनख्वाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कार्यकर्त्यांच्या वेशात सभेत घुसला होता. सभा सुरू असताना आणि स्टेजवर भाषण सुरू असताना त्याने स्टेजजवळ जाऊन स्वत:ला उडवलं.
अल जझीराच्या म्हणण्यानुसार, या घटनेमागे ISISचा हात असू शकतो, मात्र अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
बॉम्बस्फोटानंतर 5 रुग्णवाहिकांच्या मदतीने आतापर्यंत सुमारे 200 जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
राजस्थानची अंजू पाकिस्तानच्या याच प्रांतात राहणारा व्यक्ती नसरुल्लाह याच्यासोबत राहते.