International Tiger Day 2023 : ...यासाठी साजरा करतात 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन'; वाचा महत्त्व
वाघ हा निसर्गातील की-स्टोन प्रजातींपैकी एक मानला जातो. वाघांमुळे निसर्गाची विविधता आणि संपन्नता कायम राहते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिसर्गाच्या अन्न साखळीमध्ये त्याचे स्थान सर्वात वरचे आहे. त्यामुळे निसर्गातील इतर प्राण्यांच्या संख्येमध्ये समतोलता राहून पर्यायाने निसर्गातील समतोलता टिकवली जाते.
पण नैसर्गिक अधिवास नष्टता, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे आज वाघांची संख्या प्रचंड वेगाने कमी होतेय.
याबाबत जागरुकता करण्यासाठी दरवर्षी 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करण्यात येतोय.
रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये 29 जुलै 2010 साली झालेल्या व्याघ्र संवर्धनाच्या शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे असा आहे.
महाराष्ट्रात एकूण महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. तर, देशात एकूण तीन हजारांहून अधिक वाघांची संख्या आहे.
जसे पांढरे वाघ, पांढरे काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ, काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ असे विविध रंगांचे वाघ आहेत. आतापर्यंत जवळपास बाली वाघ, कॅस्पियन टायगर, जावन टायगर आणि टायगर हायब्रीड या प्रजाती नामशेष झाल्या आहेत.