G20 Summit: बायडेन, सुनक यांच्यासह जगभरातील नेते महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक; पाहा फोटो
आज पंतप्रधान मोदी G20 तील जागतिक नेत्यासोबत राजघाटावर आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G20 तील जागतिक नेत्यांनी नवी दिल्लीतील G20 परिषदेच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींना राजघाटावर आदरांजली वाहिली.
ब्राझिलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो दा सिल्वा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महात्मा गांधींना राजघाटावर आदरांजली वाहिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
जगभरातील नेते महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.
पंतप्रधान मोदींसह ब्राझिलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो दा सिल्वा आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
ओमानचे उपपंतप्रधान असद बिन तारिक बिन तैमूर अल सईद हे राजघाटावर आले होते. सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग हेसुद्धा राजघाटावर पोहोचले होते.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांनीही महात्मा गांधींच्या समाधीस्थळी येऊन श्रद्धांजली वाहिली.
राजघाट परिसरात येताच पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांचं स्वागत केलं, त्यांना खादीची भेट दिली.
यावेळी पंतप्रधादान मोदींनी नेत्यांना बापू कुटीचं महत्त्व सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी खादीचा अंगरखा देत G20 तील सर्व नेत्यांचं स्वागत केलं.