US: अमेरिकेवर महापुराचं सावट! अनेक शहरं पाण्याखाली; पाहा फोटो...
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सर्वच भागात मुसळधार पावसामुळे पुराचा कहर पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहायलँड फॉल्स, ऑरेंज काउंटी आणि न्यूयॉर्कमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पेनसिल्वेनिया शहरात देखील पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. बऱ्याच गाड्या सकल भागात साचलेल्या पाण्यात अडकल्या आहेत.
image 1
गाडीतील लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अमेरिकेत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि पेनसिल्वेनिया शहरांतील पुराचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये पुराचं पाणी घरांमध्ये कसं शिरलं, हे दिसून येतं.
गाड्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. तसंच, रस्त्यांवरुन पाणी वाहत आहे. न्यूयॉर्कमधील पुराचे फोटो भयानक आहेत.
अमेरिकेतील रहिवाशांनी पुराचे भीषण फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क शहराच्या उत्तरेकडील भागात सुमारे एक फूट (30 सेमी) पाऊस पडला.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पूरस्थिती लक्षात घेऊन रस्ते बंद केले आहेत. त्याच वेळी, लोकांना उंचीच्या भागात जाण्याचं आणि बोगद्याच्या मार्गाने न जाण्याचं आवाहन केलं आहे.
मध्य पेनसिल्वेनिया आणि दक्षिण न्यूयॉर्क शहरात प्रचंड पाऊस (New York Flood) कोसळत आहे. तर, न्यूइंग्लंडच्या काही भागांमध्ये पुराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामानशास्त्रज्ञ ब्रायन जॅक्सन यांच्या म्हणण्यानुसार, बर्लिंगटन, वर्मोंट शहरांना पुढील दोन दिवस पुराचा धोका आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून माहिती घेत म्हटलं आहे की, न्यूयॉर्कच्या ऑरेंज काउंटीमधील लोकांना बचाव पथक सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करत आहे.
हवामान विभागाने सकल भागात राहणाऱ्या लोकांना उंचावरील क्षेत्रात जाण्याचं आवाहन केलं आहे.
न्यूयॉर्कमधील पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.