US Independence Day : आजच्या दिवशी अमेरिकेला मिळालं स्वातंत्र्य, फ्रान्सकडून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट
भारताप्रमाणेच या देशातील जनतेवरही इंग्रजांनी अत्याचार केले. मोठ्या लढ्यानंतर अमेरिकेने 4 जुलै 1776 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेत (America) दरवर्षी 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या वर्षी अमेरिका 247 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. अमेरिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय सुटी असून आजच्या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.
अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जगभरात प्रसिद्ध आहे. जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेला हा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक आहे.
आजच्या दिवशी म्हणजे 4 जुलै रोजी फ्रान्सने अमेरिकेला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार करण्याचं काम अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी मिळून केलं होतं. या पुतळ्याचा पाया अमेरिकेने बांधला होता, तर पुतळ्याचा वरचा भाग फ्रान्समध्ये तयार करण्यात आला होता.
4 जुलै 1776 या दिवशी फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट दिला होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्क बंदरात स्थित 'द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' हे स्वातंत्र्य आणि मैत्रीचं प्रतिक आहे.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळा फ्रान्समध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर ते भाग अमेरिकेत आणून हा भव्य पुतळा निर्माण करण्यात आला. मे 1884 मध्ये, हा पुतळा फ्रान्समध्ये पूर्ण झाला.
जून 1885 मध्ये सुमारे 300 तुकड्यांमध्ये असलेला हा पुतळा अमेरिकेत आणण्यात आला. न्यूयॉर्क हार्बरमध्ये याचे भाग जोडून 151 फुटांचा पूर्ण पुतळा उभारण्यात आला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे वजन 204,117 किलो इतकं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मूर्तीचं वजन अंदाजे 250,000 पौंड आहे. हा पुतळा तयार करताना शुद्ध तांबे आणि स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पूर्ण नाव लिबर्टी एनलाइटनिंग द वर्ल्ड असं आहे. रोमन पौराणिक कथांमध्ये स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या रोमन देवी लिबर्टासच्या नावावरून या पुतळ्याचं नाव देण्यात आलं आहे.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळा शुद्ध तांब्यापासून तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याचा मूळ रंग तपकिरी होता. पण, बदलत्या वातावरणामुळे पुतळ्याच्या बाहेरील तांब्याच्या आवरणावर कपर कार्बोनेट तयार होण्यास सुरुवात झाली.
त्यामुळे याचा रंग बदलला. पुतळा स्थापन झाल्यानंतर 30 वर्षांनी हा बदल जाणवू लागला. कॉपर कार्बोनेटमुळे आता हा पुतळा हिरव्या रंगाचा दिसतो.
या पुतळ्याच्या डोक्यावरील मुकुटामध्ये बाल्कनी आहे. अनेक पर्यटक येथे भेट देतात. तुम्हाला पुतळ्याच्या माथ्यावरील बाल्कनीमध्ये पोहोचायचं असल्यास 354 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढण्यासाठी सरासरी 30 ते 40 मिनिटे लागतात.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याच्या मुकुटावर 7 अणकुचीदार टोकं आहेत आणि याचा वेगळा अर्थ आणि महत्त्व आहे. हे स्पाइक्स जगातील 7 महाद्वीपांचे प्रतिक असून प्रत्येक स्पाइकची लांबी 9 फूट आणि वजन सुमारे 150 पौंड आहे. मुकुटामध्ये 35 खिडक्या आहेत.