PHOTO : थायलंडच्या 'नट्टी द युट्यूबर'ने चाहत्यांना घातला 575 कोटी रुपयांचा गंडा
थांयलडची स्टार युट्यूबर नथामोन खोंगचाक उर्फ नट्टी द युट्यूबरने तिच्या चाहत्यांना 575 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या प्रसिद्धाचा फायदा घेत या युट्यूबरने कमी वेळात मोठा परतावा देतो असं आश्वासन देत हजारो चाहत्यांना फसवलं आणि तिने पैसा घेऊन पोबारा केला असल्याचं समोर आलं.
या गोष्टीचा फटका तब्बत 6000 चाहत्यांना बसला असून त्यांचे पैसे बुडाले आहेत.
नथामोन खोंगचाक उर्फ नट्टी द युट्यूबर ही थायलंडमधील सोशल मीडियातील इन्फ्लुएंसर असून युट्यूबवर तिचे जवळपास आठ लाख फॉलोअर्स आहेत.
पाच महिन्यांपूर्वी तिने तिच्या चाहत्यांना कमी कालावधीत जास्त पैसा कमावण्यासाठी तिच्याकडे काही स्कीम असल्याचं सांगितलं.
या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर चाहत्यांनी आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावं असंही आवाहन तिने केलं.
नट्टी द युट्यूबर तिच्या चाहत्यांना पैसा कमावण्याच्या तीन स्कीम्स सांगितल्या. त्यामध्ये तीन महिन्यात 25 टक्के परतावा, सहा महिन्यात 30 टक्के आणि एका वर्षात 35 टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं
यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे मिळतील असं तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे एप्रिलपर्यंत पैसे मिळतही होते. पण त्यानंतर मात्र कुणालाही पैसा मिळाला नाही.
मे महिन्यात तिने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आणि चाहत्यांनी गुंतवलेला सर्व पैसा बुडाला असं सांगितलं. ट्रेडिंग करताना आपली चूक झाली आणि सर्व पैसा बुडाल्याची कबुली दिली.
नथामोन खोंगचाक हिने काही महिन्यांपूर्वी या नावाने आपला शेवटचा युट्यूब व्हिडीओ शेअर केला होता.