World Vada Pav Day 2022 : जाणून घ्या मुंबईच्या वडापावची गोष्ट
सम्राट वडापाव : विलेपार्ले येथे मिळणारा सम्राट वडापावही फार प्रसिद्ध आहे. या वडापावची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला वडापावबरोबरच मिक्स भजींचाही आस्वाद घ्यायला मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी लांबून लोक येथे भेट देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाऊचा वडापाव : मुंबईतील फेमस वडापाव सेंटर म्हणजे भाऊचा वडापाव. या वडापावची खासियत म्हणजे आलं आणि नारळाची चटणी. पाटील भवन, एन. एस. रोड, स्टेशन रोड मुलुंड (पश्चिम) या ठिकाणी हा वडापाव खाण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येतात.
मंचेकर वडापाव : जांबोरी मैदानाच्या अगदी समोर हा मंचेकर वडापाव मिळतो. या वडापावला कायमच ग्राहकांची मोठी पसंती असते.
अशोक वडापाव (किर्ती कॉलेज वडापाव) : मुंबईच्या किर्ती कॉलेजच्या अगदी समोर अशोक वडापाव सेंटर आहे. हा वडापाव मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. या ठिकाणचा चुरा पावही फार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटीही या ठिकाणी येऊन या वडापावचा आस्वाद घेतात.
सारंग बंधू वडापाव (प्रभादेवी) : प्रभादेवीतील Century Bazaar येथे यांचा हा स्टॉल आहे. गरमागरम वडा आणि झणझणीत चटणी यांमुळे खूप फेमस आहे.