Mother Teresa Birthday Anniversary : शांततेच्या दूत, मानवतेची मूर्ती मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त जगभरातून अभिवादन!
एक थोर मानवतावादी समाजसेविका आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी मदर तेरेसा यांची आज जयंती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमदर तेरेसा यांचे मूळ नाव ॲग्नेस गोंक्झा बोजाक्किऊ. त्यांचा जन्म युगोस्लाव्हियामध्ये झाला.
मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
चर्चमधील लहान मुलांकडूनही मदर तेरेसा यांना अभिवादन करण्यात आलं.
कोलकात्यातील एन्टली या उपनगरातील लॉरेटो संस्थेच्या सेंट मेरीज स्कूल या मुलींच्या शाळेत सुरुवातीला शिक्षिका आणि नंतर प्राचार्य म्हणून सिस्टर तेरेसा यांनी वीस वर्षे काम केले.
देशातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी मदर टेरेसा (Mother Teresa) यांनी आपले जीवन समर्पित केलं. त्यांनी भारतात आपल्या कार्याची सुरुवात केली.
मदर टेरेसा यांना 7 ऑक्टोबर 1950 रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी या (Missionaries of Charity) संस्थेची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
आज त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून देशभरात शेकडो अनाथालयं आणि रुग्णालयं कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.
मदर टेरेसा यांच्या या कार्याची दखल घेऊन 1979 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.