Modi Thali: आता अमेरिकेत खास ‘मोदीजी थाळी’, न्यू जर्सीमधील एका रेस्टॉरंटनं तयार केली स्पेशल थाळी
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दिल्लीतील एका रेस्टॉरंटनं मोदींना समर्पित थाळी तयार केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया थाळीचं नावच ‘56 इंच’ असं ठेवण्यात आलं होतं.
आता पुन्हा एकदा अशाच एका थाळीची जोरदार चर्चा रंगली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने न्यू जर्सीमधील एका रेस्टॉरंटनं ‘मोदीजी थाळी’ तयार केली आहे
या थाळीचं लवकरच अनावरण करण्यात येणार आहे.
याचबरोबर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या नावाने ‘जयशंकर थाळी’ही तयार करण्यात येणार आहे
भारतीय विविधतेचं दर्शन या थाळीतील पदार्थांवरून होणार आहे.
या थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसो दा साग, दम आलू, कश्मिरी, इडली, ढोकळा, ताक आणि पापड यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहेत.
यंदाच्या दौऱ्याला 'स्टेट व्हिजिट' हा सर्वोच्च दर्जा आहे.