तालिबानचा सामना करण्यासाठी हजारो सेनानी पंजशीर खोऱ्यात एकत्र
अफगाणिस्तानच्या पंजशीर व्हॅली प्रदेशात जमलेल्या तालिबानविरोधी शक्तींनी सांगितले की, कोणतेही युद्ध आणि संघर्ष उफाळण्यापूर्वी शांतता आणि संवाद सुरू ठेवण्याचा या गटाचा मानस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीबीसीच्या रिपोर्टनुसार, नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानचे अली नाजारी म्हणाले की, तालिबानविरोधी नेते अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली हजारो लढाऊ जमले होते.
मसूदची फौज प्रतिकार करण्यासाठी तयार असल्याचे सांगत नाजारी यांनी तालिबानला चर्चेसाठी आवाहन केलं आहे.
ते म्हणाले, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय प्रतिकार आघाडीचा असा विश्वास आहे की कोणत्याही शाश्वत शांततेसाठी आपल्याला अफगाणिस्तानच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करावे लागेल.
ते म्हणाले, की गेल्या 40, 100 किंवा 200 वर्षांपासून देशात पाहत असलेल्या त्याच पद्धतीसह आम्ही पुढे जाऊ शकत नाही. देशातील सर्वात मोठी समस्या केंद्रीकृत राजकीय व्यवस्था आहे.
ते पुढे म्हणाले, अफगाणिस्तान हा वांशिक अल्पसंख्याकांचा बनलेला देश आहे. तो एक बहु-सांस्कृतिक राष्ट्र आहे. इथं सत्तेच विकेंद्रीकरण आवश्यक आहे. जर एक राजकीय ताकद, मग ती कोणतीही असो, कुठूनही येत असो, जर त्यांनी राजकारणावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला तर ते केवळ अंतर्गत युद्ध आणि सध्याच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण करेल.”
गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन पोस्टच्या एका लेखात अहमद मसूदने अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याचा शेवटचा गड म्हणून पंजशीरचे रक्षण करण्याचे वचन दिले होते. यासाठी पाश्चिमात्य देशांना मदत करण्याचे आवाहन केलंय.