कसाबसारखा मेट्रो स्थानकावर हल्ला; इराणचा इस्त्रायलवर 200 संहारक क्षेपणास्त्राचा मारा, आकाश पेटून उठले, Photo
हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला आणि हमासच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्राचा मारा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया हल्ल्यानंतर संपूर्ण इस्राइलमध्ये आपातकालीन सायरन वाजू लागले आहेत. तसेच इस्राइली नागरिकांनी सुरक्षेसाठी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे.
इस्राइलचा एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे अलर्टवर आहे. नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इस्रायलच्या लष्करानं दक्षिण लेबनॉनमधली हिजबुल्लाहची ठिकाणं आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ग्राऊंड ऑपरेशन सुरू केलंय. त्याचवेळी आता इराणने इस्त्रायलवर हल्ला केला आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्वालामुखी म्हणून ओळखला जाणारा पश्चिम आशिया पुन्हा धगधगतोय. गेलं वर्षभर गाझा पट्टीवर हल्ले करणाऱ्या इस्रायलनं काही दिवसांपासून आपलं लक्ष आता लेबनॉनवर केंद्रित केलंय.
हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला मूळापासून संपवणं हे इस्रायलचं लक्ष आहे. त्यानंतर इराणने या संघर्षमध्ये भाग घेतला असून इस्त्रायलला लक्ष्य केलं आहे.
इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागल्यानंतर इस्त्रायलने त्यांच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.
इस्रायलच्या सैन्याने सीमेला लागून असलेल्या 24 लेबनॉनी समूहांना तेथून निघून जाण्याचे आदेश दिले आहेत.
इस्रायलने लेबनॉनच्या हद्दीत काही लहान हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाचे अनेक सुरुंग उद्ध्वस्त केले.
तेल अवीवमध्ये दोन दहशतवाद्यांनी अजमल कसाबप्रमाणे हातात अत्याधुनिक रायफल घेऊन लोकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, दोघांचा खात्मा करण्यात आला.