Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बेजट 2024 सादर केल्यानंतर सोन्याच्या किंमती 3 ते 4 हजार रुपयांनी उतरल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली असून पितृपक्षातही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर आज 77 हजार 500 एवढा आहे.
भारतातील सोन्याचे वाढते दर पाहता विदेशातील सोन्याच्या दरात वाढ झालीय का हेही पाहता येईल. इराण हा पश्चिम आशियातील एक देश आहे, त्याची राजधानी तेईरान आहे.
इराणमध्ये 24 कॅरेट 1 तोळा सोन्याचा दर 41,881 इराणी रियाल (चलन) एवढं आहे. तर, 5 तोळे म्हणजे 50 ग्रॅम सोन्याची किंमत 2,09,408 इराणी रियाल एवढी आहे.
दरम्यान, इराणमध्ये भारतातील एक रुपयाची किंमत 502.50 इराणी रियाल एवढी आहे. त्यामुळे, भारताच्या तुलनेत इराणमध्ये सोनं जास्तीत जास्त स्वस्त असल्याचं दिसून येतं.
सोनं हा मौल्यवान आणि साधारणपणे सर्वात महागडा धातू मानला जातो. दागदागिने बनवणे आणि मंगलप्रसंगी आपल्याकडे सोन्याला विशेष महत्त्व आहे.
सोनं हा भावनिक आणि नात्यांशी जोडणारा देखील धागा आहे, लग्नकार्यात सोन्याचे दागिने करावेच लागतात, असा अलिखीत नियम आहे. तर, मनी-मंगळसुत्र तरी गरिबातील गरीत जोडपेही लग्नात करतात.