Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धाचा आगडोंब, 300 जणांचा बळी
या हल्ल्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टिनी समर्थक हमास यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ला करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगाझा पट्टीतील लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगण्यात आलं आहे, ज्यामुळे इस्रायलने हल्ला केल्यास त्यांना फटका बसू नये.
हमासच्या क्षेपणास्त्र आणि जमिनीवरील हल्ल्यांमुळे आतापर्यंत इस्रायलमध्ये 300 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्या 1500 च्या पुढे गेली आहे.
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 232 आहे, तर 1700 लोक जखमी झाले आहेत.
इस्त्रायली नौदलाने देशाच्या दक्षिण भागातील जिकिम बीचवर हल्ला हाणून पाडला आहे, अशी माहिती इस्रायल संरक्षण दलाने दिली आहे.
हमास दहशतवादी इस्रायलमध्ये घुसखोरी करत असून इस्रायली नागरिकांना लक्ष्य करत आहेत.
हमासने इस्रायली नागरिकांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याचं इस्रायल सरकारने सांगितलं आहे.
अल जझीराच्या वृत्तानुसार, रविवारी पहाटेही इस्रायलकडून गाझा पट्टी हल्ले करण्यात आले. शनिवारी हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही जोरदार हल्ले सुरु केले आहेत.
इस्रायली सरकारने हमासच्या हल्ल्यानंतर आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि लष्करी कारवाईला सुरुवात केली.