Israel War Photos: इमारती उद्ध्वस्त, लोक जखमी; हमासच्या 5,000 रॉकेट हल्ल्यांनी इस्रायल हादरलं, पाहा फोटो
पॅलेस्टाईनच्या गाझामधील हमास गट आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे. हमासने आज सकाळी अचानक इस्रायलवर रॉकेट हल्ले केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकामागून एक 5 हजार रॉकेट डागल्याने इस्रायलची स्थिती ढासळली. हमासकडून इस्रायलच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक वाहनांचं नुकसान झालं. गाड्यांना आग लागली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये इस्रायली रणगाडेही जळताना दिसत आहेत.
ऐतिहासिक, राजकीय आणि धार्मिक अशा अनेक कारणांसाठी हमासने इस्रायलवर हल्ले केले आहेत. हमासचा पॅलेस्टिनी प्रदेश, विशेषत: वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमवरील इस्रायलच्या ताब्याला विरोध आहे.
इस्रायली लष्कराच्या अत्याचाराच्या निषेधार्थ हमासने नुकताच हा हल्ला केला आहे.
इस्रायल आणि इजिप्तने अलीकडेच नाकेबंदी केलेल्या गाझा पट्टीवर हमासचे राज्य आहे. इजिप्त हा इस्रायलला पाठिंबा देणारा मुस्लिम देश आहे. नाकाबंदीमुळे व्यापारावरही परिणाम झाला. यामुळे आर्थिक आघाडीवर संकट आणि राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
इस्रायली हवाई हल्ले, लष्करी हल्ले अशा अनेक घटनांच्या निषेधार्थ हमासने हल्ले केले आहेत.
इस्रायलमधील सामान्य लोकांचा जीव धोक्यात येताच इस्रायली सैनिकांनी देखील हल्ला सुरू केला आहे.
इस्रायली सैनिकही या अचानक आलेल्या आव्हानाचा जोरदार सामना करत आहेत.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनीही हमास या अतिरेकी संघटनेचं धाडस पाहता प्रतिहल्ल्याची तयारी दर्शवली आहे.. त्यांनी इस्रायली सैनिकांना प्रत्येक भागात ठामपणे तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत.