Israel Palestine Conflict : इस्रायली सैनिक समजून हमासकडून महिलेची विवस्त्र धिंड, सत्य समोर येताच...
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांना लक्ष्य केलं आहे. इस्रायलींचं अपहरण करुन त्यांना ओलिस ठेवत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॅलेस्टिनचा दहशतवादी गट हमासने 6 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट डागले. यावेळी त्याने अनेक निष्पाप लोकांना आपले बळी बनवले.
हमासने हल्ला करत एका महिलेला इस्रायली सैनिक समजून बेदम मारहाण करत तिचे हात-पाय तोडले. त्यानंतर तिच्या मृतदेहाची नग्न धिंड काढली.
इस्रायली सैनिक समजून हमासने ज्या महिलेली विवस्त्र धिंड काढली, ती मूळची जर्मनीची होती. त्या तरुणीचं नाव शानी लौक होतं.
जर्मनीतील शानी लौक ही व्यवसायाने टॅटू ऑर्टिस्ट होती. शानी संगीत महोत्सवात (Music Festival) सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेली होती.
शानी लौकची हत्या करून हमासचे दहशतवादी तिच्या मृतदेहाची विटंबना करत 'अल्लाह हु अकबर'चे नारे देतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हमासच्या हल्ल्यानंतर महिलेचा मृतदेह कारमध्ये घेऊन जात असताचे व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओमधील टॅटू पाहून त्या महिलेची ओळख पटली आहे.
तरुणीच्या पायावर असलेले टॅटू पाहून तिच्या आईने 30 वर्षीय शानी लौकची ओळख पटवली आहे.
त्यामुळे महिलेचा मृतदेह इस्रायली सैनिकाचा नसून शानी या जर्मन तरुणीचा असल्याचं समोर आलं आहे.
हमासच्या सैनिकांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून इतर नागरिकांसह शनीचं अपहरण केलं आणि शानीची हत्या केली.