2 धावांवर 3 बाद ते.... 4 बाद 201, विराट-राहुलने ऑस्ट्रेलियाकडून विजय हिसकावला
कठीण परिस्थितीत विराट कोहलीने 85 तर केएल राहुलने नाबाद 97 धावांची खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाची विजयी सुरुवात केली आहे. केएल राहुल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेएल राहुल याने कठीण परिस्थितीत भारताचा डाव सावरला. विराट कोहलीचा साथ देत भारताच्या डावाला आकार दिला. भारतीय संघाच्या विजयात राहुलने सिंहाचा वाटा उचलला. केएल राहुलने 97 धावांची नाबाद खेळी केली.
राहुलने 115 चेंडूमध्ये 8 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 97 धावांची खेळी केली. विराट कोहलीसोबत दीडशतकी भागिदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिकला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला.
रनमशीन विराट कोहलीने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम केले आहे. दोन धावांत तीन बाद... अशा कठीण परिस्थितीत विराट कोहलीने केएल राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरला.
विराट कोहलीने 85 धावांची झुंजार खेळी केली. विराट कोहलीने 116 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा संयमी सामना केला. त्याने राहुलच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनीही एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर देत धावसंख्या हालती ठेवली. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 215 चेंडूत 165 धावांची भागिदारी केली.
भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडाली. निर्धारित 49.3 षटकात ऑस्ट्रेलियाने 199 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. तर 9 फलंदाज 30 धावसंख्या ओलांडू शकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी संघर्ष केला, पण मोठी खेळी करता आली नाही. स्मिथने 46 तर वॉर्नरने 41 धावांची खेळी केली.
भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या. अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजाने तीन विकेट घेतल्या. तर कुलदीपने दोन विकेट घेतल्या.
भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानसोबत 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे.