Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Facts: जगातील 'या' देशाकडे सर्वात जास्त सोनं; पाहा भारत कितव्या स्थानावर?
भारतात सर्वात जास्त सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. असं असलं तरी जगात असे काही देश आहेत ज्यांच्याकडे भारतापेक्षा जास्त सोनं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत भारताचा नंबर तर पहिल्या पाच देशांमध्ये सुद्धा येत नाही.
सोन्याचे भाव हे नेहमीच सर्वाधिक असतात, त्यात मंदीच्या भीतीने सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. संकट काळात उपयोगी पडणारी गुंतवणूक म्हणून सर्वच देश सोन्याचा साठा करत आहेत.
सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांबद्दल बोलायचं झालं तर यात पहिला नंबर अमेरिकेचा लागतो. अमेरिककडे 8133 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.
सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांमध्ये दुसऱ्या नंबरवर जर्मनी आहे. जर्मनीकडे 3359 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.
तिसऱ्या नंबरवर इटली आहे. इटलीकडे 2451.84 मेट्रिक टन सोनं आहे. इतिहासात पाहिलं तर, इटलीतील राजा-महाराजांनी लूटमार आणि आक्रमण करुन आपली सोन्याची तिजोरी वाढवली होती.
चौथ्या नंबरवर फ्रान्स आहे. फ्रान्सकडे 2436.35 मेट्रिक टन सोनं आहे. एके काळी फ्रान्सचा संपूर्ण जगावर दबदबा होता.
सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत पाचव्या नंबरवर रशिया आहे. रशियाकडे 2298.53 मेट्रिक टन सोनं आहे.
या यादीत भारत नवव्या क्रमांकावर आहे. भारताकडे 743.83 टन सोन्याचा साठा आहे.
पण इतिहासात एक काळ असाही होता, जेव्हा भारताकडे सर्वाधिक सोन्याचा साठा होता.