Israel Iran War: इराणने सोडलेली 200 विध्वसंक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट; तरीही इस्रायलचं मोठं नुकसान
इस्त्रायल आणि इराण यांच्यात वादाचा भडका उडाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइराणनं इस्त्रायलवर एकापाठोपाठ एक 200 क्षेपणास्त्राचा मारा केला.
इराणनं क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्त्रायलमध्ये सायरन वाजू लागले. त्यानंतर सामान्य लोकांना बॉम्बरोधक ठिकाणांवर पाठवण्यात आलं.
इराणने मारा केलेले काही क्षेपणास्त्रांचे तुकडे जमिनीवर पडले. मात्र इस्रायलने एअर डिफेन्स सिस्टिम (आयर्न डोम) ने काही क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट केले. पण इराणचे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागली.
इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिममध्ये वापरण्यात येणारी क्षेपणास्त्रं अतिशय महागडी आहेत. त्यामुळे बहुतांश क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट, तरीही इस्रायलचं मोठं नुकासान झालं आहे.
इस्रायलच्या लष्करानं दक्षिण लेबनॉनमधली हिजबुल्लाहची ठिकाणं आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ग्राऊंड ऑपरेशन सुरू केलंय. त्याचवेळी आता इराणने इस्त्रायलवर हल्ला केला आहे.
हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला मूळापासून संपवणं हे इस्रायलचं लक्ष आहे. त्यानंतर इराणने या संघर्षमध्ये भाग घेतला असून इस्त्रायलला लक्ष्य केलं आहे.