Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Gaza Attack : गाझामध्ये बत्ती गुल, अन्न-पाण्याची टंचाई; इस्रायलकडून हमासची नाकाबंदी
इस्रायलने गाझामध्ये कहर केला असून, त्यानंतर अन्न, पाणी, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रायल आणि हमास यांच्यातील भीषण युद्ध सलग अकराव्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, गाझामधील परिस्थिती अतिशय भयावह आहे.
2.3 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई दलाकडून सातत्याने हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 2800 हून पॅलेस्टिनी लोक मारले गेले आहेत आणि 9000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुले आणि महिलांची संख्या अधिक आहे.
इस्रायलच्या गाझावरील हल्ल्यामुळे गाझामध्ये मोठं संकट निर्माण झालं आहे. येथील वीज खंडित झाली असून, अन्न-पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. रुग्णालयांची अवस्था वाईट झाली आहे. इंधनाचा साठा लवकरच संपणार आहे.
अल जझीराच्या रिपोर्टनुसार, गाझा पट्टीतील लोक भुकेने आणि तहानने व्याकूळ झाले आहेत. अन्नपुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे गाझामधील लोकांना अन्न टंचाईला सामोरे जावं लागत आहे.
हमासचा शेवटचा दहशतवादी मारला जाणार नाही तेव्हाच हे युद्ध संपेल, असं इस्रायलनं म्हटलं आहे. तर हमासकडूनही युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीत.
गाझाचे आरोग्य मंत्री माई अल-कैला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीच्या रुग्णालयांमध्ये जनरेटर चालवण्यासाठी इंधनाचा साठा संपला आहे, यामुळे रुग्णालयांमध्ये उपचार घेणंही कठीण झालं आहे. गाझामध्ये वीज नाही, पाणी आणि अन्नही नाही.
गाझामध्ये औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. वीज प्रकल्पातील इंधनही संपलं आहे. त्यामुळे वीज पूर्णपणे खंडित झाला आहे. इस्रायलने 9 ऑक्टोबरपासून गाझाला होणारा वीजपुरवठा बंद करून संपूर्ण 'नाकाबंदी' जाहीर केली आहे.
इस्रायलच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने 199 लोकांना ओलीस ठेवलं आहे.
हमासने पुन्हा एकदा इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेमवर रॉकेटने हल्ला केला आहे. तेल अवीव आणि जेरुसलेमवरील ताज्या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने स्वीकारली आहे.