In Pics : जाणून घ्या आंतरराष्ट्रीय चहा दिवसाबद्दल...
दैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जगभर आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीयांसाठी चहा हे केवळ एक पेय नाही तर जीवनाचा अतूट भागच आहे. बहुसंख्य भारतीयांची सकाळ ही चहाने सुरु होते.
भारताने 2015 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला.
त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने यावर अनेक देशांचा विचार घेऊन 21 मे हा जागतिक चहा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला.
हे शरीराला फायदेशीर असतात. चहामध्ये फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीरात शक्तिशाली अॅन्टीऑक्सिडन्ट्स म्हणून कार्य करतात.
तर मग आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात असताना तुम्ही मात्र चहाचा अस्वाद घ्यायला विसरु नका.
जगात चहाचा शोध आणि चहाची शेती सर्वप्रथम चीनमध्ये करण्यात आली होती असं सांगण्यात येतंय.
इंग्रजांनी 1836 सालापासून भारतात चहाचे उत्पादन सुरु केलं. सुरुवातीला यासाठी चीनमधून चहाचे बी मागवले जायचे. त्यानंतर आसामच्या भागातील चहाच्या बियांचा वापर सुरु झाला.
आज चहा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय आहे. आसामचा चहा सर्व जगभर प्रसिध्द आहे. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या मते, भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केलं जातं.
चहामध्ये प्रोटिन, पॉलीसॅकेराइड, पॉलिफेनॉल, मिनरल्स आणि अमिनो, कार्बनिक अॅसिड, लिग्निन आणि मिथाइलक्सैन्थिन (कॅफिन, थिओफिलाइन आणि थियोब्रोमाइन) हे घटक असतात.